| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील खारघर विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.3) पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 व 2 यांची पुनर्रचना करुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 वाशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 बेलापूर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3 पनवेल असे तीन परिमंडळ निर्माण करण्यात आलेले आहेत. तसेच, परिमंडळ 3 मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त खारघर विभाग हे पद नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे. खारघर विभागाअंतर्गत खारघर, कामोठे, कळंबोली व तळोजा अशी 4 पोलीस स्टेशनची हद्द निश्चित करण्यात आलेली आहे. खारघर विभागाचा कार्यभार सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी 1 ऑगस्ट रोजी स्विकारला आहे.







