। पनवेल । वार्ताहर ।
मांगीलाल चौधरी व सहकार्यांनी दहिवली पाली फाटा येथे सुरू केलेल्या बधाई स्वीट अँड नमकींन दुकानाचे उद्घाटन पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केले.
यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, शिवानी जंगम, केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम,किशोर पाटील,मोहन औसरमल, तुकाराम साबळे,नासिर पटेल,निजामुद्दीन जळगावकर,कैलास गायकवाड,अविनाश तावडे,संजय पाटील,शाम कांबळे,जयंत पाठक,भगवान पाटील,प्रसाद तावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.