मंडळ कार्यालयाचे लोकार्पण

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या सप्ताहाच्या निमित्ताने नेरळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. तर, दहिवली तर्फे वरेडी आणि कोल्हारे येथील तलाठी कार्यालयाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

नेरळ येथील चावडी नाका येथे असलेल्या शासकीय इमारतीत मंडळ अधिकारी आणि नेरळ तलाठी सजा ही कार्यालये होती. त्याचवेळी माणगाव, दहिवली कोल्हारे, मानिवली, पाषाने सजाचे तलाठीदेखील याच कार्यालयांमधील कारभार पाहायचे. त्यामुळे नेरळ मंडळ अधिकारी यांना तेथील कार्यालय अपुरे पडत होते. तर वाढलेली महसुली कामे यामुळे मानिवली, पाषाण आणि माणगाव येथील तलाठी सजा हे त्या त्या गावी गेल्यामुळे नेरळ तलाठी कार्यालयामधून मंडळ अधिकारी आणि कोल्हारे तसेच नेरळ तलाठी सजा यांचा कारभार चालत होता. मात्र मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांनी त्याच परिसरात नवीन मंडळ अधिकारी कार्यालय उभे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून नेरळ मंडळ अधिकारी कार्यालय उभे राहिले आहे. यावेळी महसूल मंडळ अधिकारी अरूण विशे, बाबासाहेब शेटे, वैशाली पाटील, आप्पा राठोड, तलाठी विकास गायकवाड, दत्ता ठोकळ, गुरूमूर्ती आदी उपस्थित होते.

Exit mobile version