| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
हौशी मित्र मंडळ आक्षी-साखर-रायवाडी आयोजित व चित्रलेखा नृपाल पाटील पुरस्कृत बैलगाडी व घोडागाडी स्पर्धेचे उद्घाटन शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते काही वेळापुर्वीच संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, अश्लेषा नाईक, सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य विनायक पाटील, निरजा नाईक, रश्मी वाळंज, नागावचे सदस्य निखील मयेकर, अनिरुध्द राणे, सुनील नाईक, उलेश नाखवा, रश्मीन गुरव, डॉ. रविंद्र पाटील, नागेश्वरी हेमाडे आदी मान्यवर, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच बैलगाडी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य बैलगाडी प्रेमी व शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
या सोहळ्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली असून घोडागाडी शर्यतीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकास फ्रिज, द्वितीय क्रमांकास वॉशिंग मशिन, तृतीय क्रमांकास स्मार्ट टिव्ही देऊन गौरविण्यात येणार आहे.