| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या दोन दिवसांपासून अलिबागच्या समुद्रकिनारी असलेल्या क्रीडा भुवनध्ये नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर अलिबागच्या चॅम्पियन ट्रॉफी कोण उंचावणार याकडे साऱ्या अलिबागकरांचे डोळे लागले आहेत. सुपर फोरपर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळ करुन आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

गुरुवारपासून क्रीडा भुवन येथे क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आठ संघांमध्ये स्पर्धा झाली. त्यात चार संघांची सुपर आठमध्ये निवड झाली. दुसऱ्या दिवशीदेखील शुक्रवारी रात्री आठ संघांमध्ये स्पर्धा झाली. चार संघांची सुपर आठमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी एसपी भार्गवी इलेव्हन, सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ, एमडी वॉरिअर्स, श्राव्या इलेव्हन संघ, आरसी ग्रूप अलिबाग, एसपी सुपर प्लेअर्स आंबेपूर आणि मी हाय कोळी रिसॉर्ट अलिबाग या संघांमध्ये सामने खेळविण्यत आले.
दरम्यान, स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रदीप नाईक आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर या संघातील अलिबाग चॅम्पियनचा मानकरी ठरणार आहे.







