तहसीलदारांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन

| तळा | वार्ताहर |

द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने श्रीकृष्ण देशमुख यांच्या स्मृतिपित्यर्थ प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत सोहळा व स्पर्धा परीक्षा केंद्र आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन डॉ. श्रीनिवास वेदक होते.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, सचिव मंगेश देशमुख, विश्‍वस्त मारुती शिर्के तसेच गो.म वेदक प्रशालेचे चेअरमन महेंद्र कजबजे इत्यादी मान्यवर हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. भगवान लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. तृप्ती थोरात यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना तहसीलदार स्वाती पाटील यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी मुलांनी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. तर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी महाविद्यालयामध्ये संशोधन केंद्र सुरू होत आहे याविषयीचे समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या केंद्रामार्फत संशोधन करता येईल, असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजाराम थोरात यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version