। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुका शिवछत्रपती क्रिकेट असोशियन पिंगळसई-धामणसई व मुठवली विभाग यांच्या वतीने जय भवानी मित्र मंडळ मुठवली खुर्द आयोजित भव्य क्रिकेट सामन्यांचे शानदार उद्घाटन रविवारी (दि.6) मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.
गोवे ग्रा.प़.सरपंच महेंद्र पोटफोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जयवंत मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती वरसे गण अध्यक्ष अनंत देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक धर्मा शेलार, युवा कार्यकर्ता महेश तुपकर, उपसरपंच योगेश शिंदे, ग्राम पंचायत सदस्य, मारुती तुपकर, गाव अध्यक्ष सतीश ठाकूर, निलेश शिंदे, मंगेश तुपकर, संदेश तुपकर, येनाजी शिंदे, विशाल शिंदे, नामदेव शिंदे, वसंत शिंदे, रोहिदास तुपकर, प्रमोद ठमके व जय भवानी मित्र मंडळ मुठवली खुर्दचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.