। पनवेल । वार्ताहर ।
जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी, उरण यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केलेल्या उरण तालुक्यातील वेश्वी येथे विविध विकास कामांचे उदघाटन पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नामदेव पाटील, शाम मुंबईकर, एकनाथ माळी, संदीप कातकरी, रामनाथ पाटील, महेंद्र मुंबईकर, शांताराम पाटील, चंद्रकांत मुंबईकर, अमृत पाटील, रमेश मुंबईकर, विजय मुंबईकर, मधुकर मुंबईकर, राजू मुंबईकर, स्नेहल पालकर, संदेश घरत, संपेश पाटील, सुरेंद्र पाटील, क्रांती म्हात्रे, अजिंक्य पाटील, माधव म्हार्त्रेे, आदिवासी बांधव जांभूळपाडा, कातकरीवाडी वेश्वी वाडीतील आदिवासी बांधव व वेश्वी गावातील गावकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे निवेदन जयदास ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन संदेश घरत यांनी केले.