खालापूर नगरपंचायतीत विकासकामांचे लोकार्पण

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि नगरसेविका लता लोते यांच्या प्रयत्नातून आ. थोरवे यांच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या निधीतू जंगम यांच्या वार्डातील शिरवली आदिवासी वाडीच्या रस्त्यांचे तसेच लोते यांच्या साबाई माता मंदिर परिसर सुशोभिकरणाचे विविध विकासकामांचे लोकार्पण आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यावर साबाई माता मंदिरात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवानी जंगम नगराध्यक्षा असताना विकासकामे केली आहेत. आम्ही त्यावर कळस चढवत असल्याचे आ. थोरवे यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप आणि शिवसेना वेगवेगळे लढलो असलो तरी विकासासाठी एकत्र आलो असल्याचे आ. थोरवे म्हणाले. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ साबाई देवीच्या मंदीरात फोडला. देवीने कौल दिल्याने निवडणून आलो. मतदार संघाचे नंदनवन केले असल्याचे सांगत खालापूर शहरासाठी पाणीयोजना लवकरच पूर्ण करू असा शब्दही दिला.

याप्रसंगी व्यासपीठावर आ. महेंद्र थोरवे, नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम, सभापती किशोर पवार आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत दिपक लोते यांनी केले.

Exit mobile version