| नेरळ | वार्ताहर |
नेरळ व परिसर वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने अखंड ज्ञानयज्ञ आणि ज्ञानेश्वरी पारायण 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होत आहे. या महोत्सवाचे आयोजन नेरळ गावातील हनुमान मंदिर येथे करण्यात आले असून प्रवचन, किर्तन, जागर भजन आणि पारायण असे कार्यक्रम सुरू आहेत. दरवर्षी प्रमाणे साडेतीन दिवसांचे अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याची सुरुवात गणेशपूजन, हनुमानपूजन, दीपपूजन, कलशपूजन, माऊलीपूजन, विठ्ठल रखुमाईपूजन, ज्ञानेश्वरीपूजन, तुळसपूजन, वीणापूजन आणि ध्वजारोहण करून करण्यात आली.
दररोज ज्ञानेश्वरी पारायण चालणार असून त्यांचे नेतृत्व शिवराम तुपे, पंढरीनाथ मनवे, विजय थोरवे, मुक्ताबाई दहीवलिकर, उर्मिला हजारे, शांताराम साळुंखे, नथुराम घडगे, पद्मा थोरवे, रोहिणी देशमुख, जोशी, वर्षा जोगळेकर, चित्रा पाटील, सुवर्णा बोभाटे, गणेश मनवे आदी करीत आहेत. या सोहळ्यात प्रवचन शिवराम तुपे, रामदास साळुंखे यांचे झाले. तर हरिपाठ श्री माऊली हरिपाठ मंडळ चिंचवली, आत्म उन्नती विश्वशांती वारकरी मंडळ वांगणी, जागर भजन श्री गणेश प्रसदिक भजन मंडळ नेरळ, श्री साई बाबा प्रासादिक भजन मंडळ मोहाची वाडी यांनी केले. तर हरिकिर्तन ज्ञानेश्वरी घाटे आणि राजेश महाराज भोईर यांनी केली आहेत.






