नेत्रतपासणी मशीनचे उद्घाटन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
लायन्स क्लब पोयनाडच्या लायन्स व्हिजन सेंटरमध्ये नेत्रतपासणी मशीनचे उद्घाटन प्रांतपाल मुकेश तनेजा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब पोयनाडच्या वतीने पोयनाड विभागातील महावितरण कर्मचार्‍यांना ओरिएंटल इन्शुरंन्स कंपनीच्या अपघात विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले, तसेच गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात नेत्रतपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवारी, (26) पोयनाड येथील लायन्स व्हिजन सेंटरमध्ये लायन्स क्लब तुर्भेने उपलब्ध करुन दिलेल्या नेत्रतपासणी मशीनचे उद्घाटन प्रांतपाल मुकेश तनेजा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रथम उपप्रांतपाल अमरचंद शर्मा, द्वितीय उपप्रांतपाल मनीष लडगे, माजी प्रांतपाल अनिल जाधव, लायन्स क्लब तुर्भेचे अध्यक्ष धीरेंद्र सिन्हा, सीएसआर फंडाचे इंचार्ज एन.आर. परमेश्‍वरन, एक्झी. डिस्ट्रीक्ट कॅबिनेट ट्रेझरल प्रदीप सिनकर, रिजन चेअरमन महेश मोघे, झोन चेअरमन अंकीत बंगेरा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या मुख्याधिकारी शुभदा कुरतडकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष विकास पाटील, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष बी.एन. कोळी, अमिष शिरगावकर, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष अविनाश राऊळ, महेंद्र पाटील, अभिजीत पाटील, लायन्स क्लब पोयनाडचे उपाध्यक्ष प्रमोद राऊत, सचिव ओमकार जोशी, मनीष अग्रवाल, दिलीप गाटे, प्रगती सिनकर, अरविंद अग्रवाल, प्रमोद पाटील, सतीश पाटील, महेंद्र पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, हेमंत पाटील आणि साहित्यिक उमाजी केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नेत्रतपासणी मशीनच्या उद्घाटनानंतर लायन्स क्लब पोयनाडच्या वतीने पोयनाड विभागातील महावितरणच्या 22 कर्मचार्‍यांना ओरिएंटल इन्शुरंन्स कंपनीच्या अपघात विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले. याबरोबरच 10 गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच 65 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यात 15 जणांना मोतीबिंदू आढळला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रस्तावना केली. तर, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रगती सिनकर यांनी केले.

Exit mobile version