श्रीवर्धन येथे पहिल्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रोगांची वाढती संख्या आणि त्यावर उपाकारक असणारी अनेक औषधे वाढल्यामुळे सर्वसामान्यांचा जीव आर्थिक ओढाताणीत मेटाकुटीस आलेला दिसतो. अशा परिस्थितीत जेनेरिक औषधांच्या किंमतींनी सर्व-सामान्यांना मोठाच दिलासा दिलेला दिसतो. यासाठीच सध्याच्या काळात ठिकठिकाणी हळूहळू जेनेरिक औषधांची दुकाने सुरु होतांना दिसतात. अशाच रोहित जनआरोग्यम्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन श्रीवर्धन येथे रविवार दि.8 मे रोजी श्रीवर्धन येथील ज्येष्ठ व अनुभवी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.व्ही.एन. जोशी यांचे शुभहस्ते झाले. या सोहळ्यास डॉ.अमोल जोशी, अप्पाशेट गंद्रे, आशीष गंद्रे, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नरेश पुलेकर, माजी अध्यक्ष दिलीप हेंद्रे, अजित मापुस्कर, श्री. आंग्रे, विजय जैन, आणि जन आरोग्य जेनेरिक प्रा.लि.चे सी.ई.ओ. बाबासाहेब पुलाटे, डायरेक्टर अभिजित पाटणकर, अमित सातपुते, सचिन साखळकर, संकेत पाटणकर आदि मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर डॉ.व्ही.एन.जोशी यांनी जेनेरिक औषधांबद्दल काही माहिती सांगितली. बाळासाहेब पुलाटे यांनी जेनेरिक औषधांबद्दलची सविस्तर माहिती सांगताना त्याबद्दलचे समज-गैरसमज याबद्दलची उकल करुन सांगितली. तसेच उपस्थितांच्या प्रश्‍नांचेही समाधानकारक खुलासे केले. आनंद जोशी यांनीही विचार मांडताना जेनेरिक औषधांबद्दलच्या काही शंका उपस्थित करुन त्याबद्दलची माहिती जाणून घेतली. समारंभात मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जेनेरिक औषधांचे पहिलेच मेडिकल स्टोअर श्रीवर्धनात सुरु करुन सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना परवडतील अशा दरांत औषधे उपलब्ध करुन दिल्याबद्दल उपस्थितांनी गंद्रे परिवाराचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version