हातमाग प्रदर्शनाचे उद्घा‌टन

| अलिबाग | वार्ताहर |

भाऊराय हॅण्डलुम सोलापुर यांचे हातमाग कापड प्रसार प्रसिद्धि व विक्री कार्यक्रमांतर्गत हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 09 ते 28 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल रायगड जिल्हा परिषद जवळ मुख्य पोस्ट ऑफिस समोर अलिबाग या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक ह्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पांडुरंग पोतन, गोवर्धन कोडम, बाळू कोडम, पुरुषोत्तम पोतन, दीपक गुंडू, श्रीकांत श्रीराम, लक्ष्मण उडता उपस्थित होते.

या प्रदर्शनास अलिबागकरांनी विणकर कामगारांची कलेला उस्पूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोकांनी केले आहे. या प्रदर्शनात कॉटन साडी, इरकल साडी, मधुराई साडी, खादी साडी, धारवाड साडी, मधूराई सिल्क साडी, सेमी पैठणी, खादी सिल्क साडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल , पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी, व शर्ट, कुर्ता, बंडी असे विविध प्रकार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version