हिराकोट तलाव सुशोभिकरण कामांचे लोकार्पण

| अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्हा नियोजन समिती रायगड सन 2021-22 अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हिराकोट तलाव येथे करण्यात आलेल्या रिटेनिंग वॉलचे बांधकाम, रेलिंग बसविणे आणि उद्यान विकसित करणे, या कामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवार (13) रोजी संपन्न झाला.

यावेळी आ. भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले. ऐतिहासिक हिराकोट तलावाच्या संवर्धन व जतनाचे महत्वपूर्ण काम जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आले. अलिबाग शहरास सरखेल कान्होजी आंग्रे यांचा ऐतिहासिक वारसा असून तो जतन करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे भाग्य लाभले, याचे समाधान असल्याची भावना मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version