| कर्जत | वार्ताहर |
मुंबई विद्यापीठाच्या ‘ए’ झोन अंतर महाविद्यालयीन मुलींच्या कॅरम व बुद्धिबळ स्पर्धांचा शुभारंभ कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयामध्ये करण्यात आला. यामध्ये कोंकण ‘ए’ झोनमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
रायगड जिल्हा कॅरम संघटनेचे खजिनदार वैभव पेठे यांच्या हस्ते कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन काळे, कर्जत तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजीव ठाकरे, राष्ट्रीय पंच अंकित जोशी, मुख्य पंच राजेश भुतकर, चैतन्य मोहिते, ओमकार जिनघरे, प्रा. मनिषा चौधरी उपस्थित होत्या. डॉ. काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वैभव पेठे यांनी मुलांनी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पोत्साहित केले. याप्रसंगी किशोर कुरुळकर, रुपाली ठाकरे, दीप्ती हुरगत, नैना बदले, रोहन पाटील, चेतना वाघ, डॉ. निलोफर खान, डॉ. रुपाली येवले, प्रदीपकुमार वाहुले, सतीश पांडव, मालोजी रनावरे, स्वप्नील फा, वनिता कणसे, प्रिय खापे, भाग्यश्री सुर्यवंशी, श्वेता दांगट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रणिता भांगरे यांनी केले.







