| वाघ्रण। वार्ताहर |
रायगड जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालय अलिबागतर्फे ग्रंथपालन अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता डोंगरे हॉलमध्ये संपन्न झाले. सुरुवातीला ग्रंथ चळवळीच्या कार्यकर्त्या महाराष्ट्र राज्य माजी राज्यमत्री श्रीमती मिनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत संयोजकांच्यावतीने करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने बोलताना नागेश कुलकर्णी यांनी कै.अॅड. दत्ता पाटील आणि भाऊ प्रभाकर पाटील यांच्या चळवळीची आठवण करीत यंदाचे 36 वे वर्ष असल्याचेदेखील सांगितले. या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख प्रशिक्षक जेएसएम कॉलेजचे ग्रंथपाल सुबोध डोहके, सारळ हायस्कूलचे ग्रंथपाल आशिष पारसमित, बामणगावचे ग्रंथपाल श्रीधर पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय सघाचे अध्यक्ष संजय बोंदर्डे, प्रकाश पाटील आदीनी उपस्थित 40 ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गातील विद्यार्थ्याना दोन महिने चालणार्या अभ्यासक्रम वर्गासंदर्भात प्राथमिक माहिती दिली. या वर्गाचे व्यवस्थापन सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉलचे प्रमुख ग्रंथपाल व अभ्यासक्रम वर्गाचे व्यवस्थापक भालचंद्र वर्तक यांनी केले. त्यांना सहकार्य सहाय्यक ग्रंथपाल रंजिता माळवे आणि अमित धुमाळ व कर्मचारीवर्गानी केले. या संपूर्ण कार्यक्रमाला रायगड जिल्हा ग्रंथालयाच्या ममता रोगे यांनीही हजेरी नोंदवली. विद्यार्थ्यानी शंका विचारल्या त्यांचे निरसन करून दर शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीला हे अभ्यासक्रम वर्ग सकाळी 11 ते 5 या वेळात चालतील असे सांगून आभाराने सांगता केली.