। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नजीक असलेल्या कळमजे गावात शिवगर्जना सार्वजनिक वाचनालय सुरु केले. त्या वाचनालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते पंकज तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कळमजेचे सरपंच स्नेह खाडे, ग्रामस्थ मोहन वाढवळ, नथुराम राऊत, हरीश्चंद्र राऊत, बाळ वाढवळ, राम पडवळ, नरेश वाढवळ, मुकुंद वाढवळ, रुपेश वाढवळ, तुकाराम वाढवळ, राम वाढवळ, प्रकाश राऊत, देवेंद्र राऊत, नारायण राऊत, विलास राऊत तसेच अन्य ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.