। महाड । वार्ताहर ।
22 रोजी आलेल्या महापुरात संपुर्ण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये महाड नगरपालिकेचे खुपच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे महाड नगरपालिकेची जुनी ईमारतीला धोका निर्माण झाला आहे.
या ईमारत येत्या 16 ऑक्टोबर रोजी ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.एकनाथ शिंदे, नाना पटोले खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. भरत गोगावले हे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्नेहल जगताप यांचे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या आठवणीना उजाळा देताना काही क्षण भारावुन गेल्या आणि माणिकराव जगताप यांच स्वप्न होत नगरपालिकेचा उद्घाटन हा थाटा माटात साजरा व्हायला पाहीजे असेही स्नेहल जगताप म्हणाले, महाड नगरपालिकेची उद्घाटनाची जय्यत तयारी सुरु आहे.