अलिबागमध्ये उद्या मसाज केंद्राचे उद्घाटन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

नॅशनल असोसिएशन फॉर दि. ब्लाईंड व नॅब रायगड मसाज सेंटर अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दृष्टिहीन महिलांसह पुरुषांसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने मसाज करण्यात येणार आहे. या मसाज केंद्राचे उद्घाटन मंगळवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजता आरसीएफ वसाहत बी. 12/3 येथे होणार असल्याची माहिती संचालिका वृंदा थत्ते यांनी दिली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी डॉ. शाम कदम, आरसीएफ कार्यकारी संचालक अनिरुध्द खाडीलकर, महसूल विभागाचे तहसीलदार चंद्रसेन पवार, डॉ. शुभदा कुडतडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दृष्टीहीन महिला व पुरुषांमध्ये एकाग्रता निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनविणे हा उद्देश समोर ठेवून हे केंद्र सुरू केले जाणार आहे. यामध्ये मसाज, अ‍ॅक्युप्रेशर, फिजिओथेरपी शास्त्रशुध्द पद्धतीने केली जाणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन थत्ते यांनी केले आहे.

Exit mobile version