वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोकण एज्युकेशन सोसायटीचे चं.ह. केळुसकर होमिओपॅथिक महाविद्यलयाच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर.जे. जैन यांच्या उपस्थितीत क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून झाले. पर्यावरणाचा र्‍हास कमी व्हावा यासाठी महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये झाडे लावा, झाडे जगवा, बेटी बचााओ, पाणी वाचवा, प्लास्टिकचा गैरवापर टाळा, असा नारा देत जनजागृतीपर फेरी काढण्यात आली.
दि. 17 ते 19 मे पर्यंत चालणार्‍या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, धावणे, रिले, रस्सीखेच, टेबल टेनिस, बुद्धिबळ आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष भगत, स्पोर्ट्स इंचार्ज डॉ. आनंद नाईक, स्टुडंट कौन्सिलचे व्हाईस चेअरमन डॉ. कविता पाटील, डॉ. सूरज पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नम्रता ठाकूर, डॉ. स्वप्ना शिंदे, डॉ. आरती गंभीर, डॉ. साक्षी पाटील, डॉ. अदिती साष्टे, डॉ. स्वाती वीरकुड आणि स्टुडंट कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी हर्ष पाटील, लेडीज रिप्रेजेंटेटिव्ह आकांक्षा देवकाते, स्पोर्ट्स सेक्रेटरी प्रतीक पाटील, ऋतुजा पाटील, सुहानी राणे यांच्यासह इतर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version