| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील समपातळीकरण केलेल्या क्रिकेट मैदानाचे गुरुवार, दि.19 डिसेंबर रोजी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील थळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मापगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, किशोर सातमकर, सानिका घाडी, युवा नेता सुचित थळे, अनिल जाधव, संजय शिंदे, सतीश घाडी, सचिन घाडी, साहिल कुर, निखिल करंजुकर, संजय अनमाने, शैलेश तिर्लोटकर, राजेंद्र घरत, गोविंद अनमाने, सुधाकर ठकरुळ, मधुकर सुद, सुप्रिया ठकरुळ, संतोष बांद्रे, अदिती नागावकर, अदिती सुद, विजय पंडम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.