| नागोठणे | वार्ताहर |
जिल्ह्यातील प्रमुख पतसंस्थांमध्ये गणना होत असलेल्या जिल्ह्यातील प्रथितयश अशा आदर्श पतसंस्थेच्या नागोठण्यातील शाखेचा स्वमालकीच्या जागेतील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरूवारी (दि.22) रा.जि.प.चे माजी सदस्य नरेंद्र जैन यांच्या हस्ते तसेच, पतसंस्थेचे पदाधिकारी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वांनी पतसंस्थेच्या नागोठणे शाखेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आदर्श पतसंस्थेच्या नागोठणे शाखेच्या या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, रा.जि.प.चे माजी सदस्य नरेंद्र जैन, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया महाडिक, विलास चौलकर, लियाकत कडवेकर, अनिल काळे, भाई टके, नाना तेरडे, निसार चौधरी, संजय काकडे, सुप्रिया काकडे, दिलिप शहासने, जयराम पवार, सुधाकर जवके, अशपाक पानसरे, दिलिप जैन, बिपिन सोष्टे, मंगेश तेरडे, निवृत्त मंडळ अधिकारी विश्वनाथ म्हात्रे, विजय नागोठणेकर, श्रीरंग देवरे, जानू कोकरे, दिगंबर खराडे आदींसह अनेक मान्यवर, पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शाखेच्या व्यवस्थापिका पूर्वा वैद्य यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पतसंस्थेच्या नूतन कर्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त दिवसभरात अनेक मान्यवरांनी भेट देऊन संस्थेला भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्यानिमित्त पतसंस्थेच्या वतीने महिलांसाठी सायंकाळी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.