राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा शुभारंभ

| तळा | वार्ताहर |

तळे  जी.एम.वेदक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. दिलीप जयस्वाल यांच्या हस्ते शनिवार दि.13 रोजी वृंदावन येथे करण्यात आले.

यावेळी गजानन मिरगळ, तानाजी वाजे, जगदीश्वर नटे, परशुराम काते, दामोदर काते, लक्ष्मण काते, डी.जी. ठसाळ, नामदेव तांबडे, सुप्रिया पागार, दिपाली पाटील, नंदिनी तांबडे, पुरुषोत्तम मुळ, प्रा. संजय गवळी, प्रा. स्नेहल सकपाळ, प्रा. पंकज घोंगडे, श्रेयस रोडे, कौस्तुभ रिसबुड, सागर सिंग, तृप्ती गायकवाड, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शनिवार दि.13 ते शुक्रवार दि.19 जानेवारी असे सात दिवस राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर वृंदावन येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, व्यसनमुक्ती, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण, हागणदारी मुक्त मोहीम, पथनाट्य, महिला सुरक्षा, मतदान जनजागृती असे वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. या व्यतिरिक्त दररोज योग शिबिर, प्रार्थना, श्रमदान, गटचर्चा, दैनंदिनी लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम हे उपक्रम घेतले जाणार आहेत.

Exit mobile version