राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा शुभारंभ

| कर्जत | प्रतिनिधी |
विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा कर्जत तालुक्यातील भोईरवाडी गावामध्ये शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबिरार्थी परिसरातील गावांमध्ये जाऊन जनजागृतीचे धडे ग्रामस्थांना देणार आहेत.

भोईरवाडी गावातील श्री मरीआई मातेच्या मंदिरात शिबिराच्या उद्घाटनाचा समारंभ आयोजित केला होता. कोंकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. अविनाश सूर्यवंशी, डॉ. रेश्मा पोरे, डॉ. दिव्या मेनन, पोलीस पाटील संदीप भोईर, संदेश भोईर, संभाजी भोईर, कीर्तनकार बाळू वाव्हळ, दिलीप लोहट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजश्री जयभाये या विद्यार्थिनीने केले. याप्रसंगी नरेश भोईर, संतोष पालकर, सुजित भोईर, संजय कोर, गजानन भोईर, कृष्णा दास, रावजी भोईर, रावजी भोईर, दुधा लोहट आदींसह महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version