राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन

। पुणे। वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रामुख्याने जगताप, सदस्य प्रदीप देशमुख,निलेश निलम, बाळासाहेब बोडके, रोहन पायगुडे,महेश हांडे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. लोकांना लॉकडाऊन पुन्हा लावण्याची तंबी दिल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना पवार यांनी केवळ खंत व्यक्त केली.यावरुन पवार यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी चुप्पी साधली होती. व्हिडिओ आणि फोटो पाहू कारवाई करुन असे सांगण्यात येत होते. मात्र, सोशल मिडियावर होत असलेली टिका टिप्पणीनंतर पोलीस कार्यरत झाले. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक अध्यक्ष महेश हांडे यांनी कार्यक्रमाकरीता ध्वनीक्षेपणाची परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यात सध्याचे कोविड संसर्गाबाबत शासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे तंतोतत पालन करुन सामाजिक सुरक्षित अंतर व सर्व जण मास्क लावतील, असे या अर्जात नमूद केले होते. त्यानुसार महेश हांडे यांना योग्य त्या अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली होती. तसेच दक्षता घेण्याबाबत नोटीस बजावली होती. हांडे यांनी कार्यक्रमाला 100 ते 150 जणांच्या उपस्थितीत उद्घाटनाला असतील असे तोंडी कळविले होते. प्रत्यक्षात अंदाजे 400 ते 500 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता कार्यक्रमामध्ये गर्दी केली होती. त्यापैकी काही लोकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते.

Exit mobile version