माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
| पनवेल | प्रतिनिधी |
अतिथी गणात पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील नगरसेवक गणेश कडू यांच्या उपस्थितीत गणेश पूजन व छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करंजाडेचे सरपंच रामेश्वर आंग्रे साकार फाउंडर डायरेक्टर हार्दिक गोकणी, सह डायरेक्टर अशोक चौधरी, उपसरपंच कैकाडी यांनी केले.
साकार स्पोर्ट अकॅडमी करंजडेमध्ये चालू केल्यामुळे स्थानिक पनवेलकरांना अकॅडमी शाखा ठिकाण सोयीचे झाले.
अकॅडमीमुळे मुलांना आपल्या कलागुणांना तसेच खेळाला वाव मिळणार असून सर्व प्रकारचे विविध खेळ व सांस्कृतिक कला येथे दर्जात्मक पध्दतीने शिकवला जाणार असल्याचे सरपंच रामेश्वर आंग्रे व फाउंडर डायरेक्टर हार्दिक गोकणी यांनी सांगितले.