प्रथमोपचार व नर्सिंग पूर्वतयारी विषयांवर मार्गदर्शन
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणार्या नर्सिंग सहाय्यक प्रशिक्षण लाभार्थीसाठी सी.एस.आर., जेएनपीटी मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून दोन दिवसीय कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे व नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी (दि.23) सहाण-अलिबाग येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सी.एस.आर. जेएनपीटी मुंबईचे जालंदर सातपुते, जन शिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ.नितीन गांधी, अॅड. निला तुळपुळे, भगवान नाईक, डॉ.विनायक पाटील, डॉ.राजाराम हुलवान, संजय राऊत व विजय कोकणे सदर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला. सदर दोन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण या विषयावर डॉ. नितीन गांधी, डॉ. हेतल गुजराथी दंत रोग तज्ञ, डॉ. हर्ष गुजराथी कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. राजाराम हुलवान सरस नर्सिंग होम वायशेत, डॉ. अमोल भुसारे मानसोपचार तज्ञ, डॉ. महालिंग क्षीरसागर सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग, डॉ. ओजस्विनी कोतेकर स्त्रीरोग तज्ञ व सल्लागार, प्रिया कर्णिक व्यवस्थापक डॉ. सरोज तांबोळी हॉस्पिटल व अॅड. निला तुळपुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.