कर्जतमधील खांडस येथे कुपोषित मुलांसाठी पोषण केंद्राचे उद्घाटन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील खांडस या भागातील कुपोषित बालकांसाठी युनायटेड वेकडून कुपोषण निर्मूलनासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न करीत आहेत. त्याच माध्यमातून पोषण केंद्र खांडस येथे सुरू करण्यात आले आहे.

कर्जत ग्रामीण भागात युनायटेड वेकडून कुपोषण निर्मूलनासाठी भागात प्रकल्प पोषण कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत पोषण कार्यकर्ते आणि कुपोषित मुलांच्या पालकांना समुपदेशन करून मुलांना कर्जत येथे एनआरसीमध्ये घेऊन येण्यासाठी सांगतात. त्यातील काही पालक मुलांच्या आरोग्यासाठी तयारही होतात. परंतु येथे आल्यावर दवाखान्यामध्ये जास्त दिवस राहण्यास तयार नसतात. जर अतितीव्र कुपोषित बालके आहेत, तर त्या बालकास कमीत कमी सात ते 21 दिवस दवाखान्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागते. परंतु, हे पालक अतिदुर्गम भागातून आले असल्यामुळे तेथे अ‍ॅडमिट राहण्यास तयार नसतात.

युनायटेड वे मुंबई यांनी ग्लीलनेस हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने प्राथमिक आरोग्य केंद्र खांडस या ठिकाणी पोषण केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी मुलांसाठी वेगळाच एक सुसज्ज रूम तयार करण्यात आला आहेत. त्यामध्ये मुलांच्या उपचारासाठी सर्व साधनांची उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या मुलांसाठी आणि पालकांसाठी येथे दिवसभर राहण्याची सोय वेगळा किचन, बाथरूम, बेड तसेच मुलांना करण्यासाठी खेळण्याचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. जेणेकरून त्यांच्यावर उपचारही होतील आणि त्यांना दवाखान्यामध्ये आल्यासारखं वाटणार नाही आणि कर्जत तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होईल.

या उद्घाटनप्रसंगी रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खांडस डॉ. आरती माने, ग्लीलनेस हॉस्पिटलचे हेमंत गुप्ता, डी.जी.एम. सेल्स आणि मार्केटिंग हेड कॉर्पोरेट आणि कम्युनिटी बिजनेस, रश्मी सावंत नरसिंग अ‍ॅडमिन सुपरवायझर, लय तायडे फायनान्स टीम हेड, तसेच युनायटेड वे मुंबईचे डॉ. शैलेश, रेणुका आणि प्रकल्प पोषणचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version