| महाड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभाग अंतर्गत महाड शहरामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाडमध्ये संपन्न झाला. राज्य शासनाच्या आरोग्य विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन आ. भरत गोगावले यांनी लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभामध्ये केले.
आपला दवाखाना केंद्रामध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, केली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्सरे करिता संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी लसीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण सेवा मोफत पुरविण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये तज्ञ वैद्यकीय पथक उपलब्ध असणार असल्याची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी डॉ. हिम्मतराव बावसकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, महाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बावडेकर, डॉ. चेतन सुर्वे, नितीन आरते, सुनील अग्रवाल, दीपक सावंत, योगेश नातेकर, नितीन पावले, सुरेश महाडिक, विजय सावंत, मोहन शेठ, विद्या देसाई, सपना मालुसरे, सिद्धेश पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जनतेच्या सेवेसाठी आपला दवाखाना
| आगरदांडा | प्रतिनिधी |
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुरुड शहरात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जनतेसाठी सज्ज झाला आहे. या दवाखानाचे शुभारंभ मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी फित कापुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी लहाने, आरोग्यवर्धिनी केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत डोंगरे, राजेंद्र चुनेकर, मनोज पुलेकर, नवापाडा कोळी समाज मुरुडचे अध्यक्ष सवाई, गजानन तरे, गणेश शिंदे, प्राची कारभारी, मयूर पाटील, नंदकुमार घाडगे उपस्थित होते
तळा मध्ये आपला दवाखान्याचे लोकार्पण
| तळा | वार्ताहर |
तळा शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने लोकार्पण झाले. तालुक्यामध्ये शहरी भागाकरिता राज्य स्तरावरून 1 आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर झाले आहे. हे केंद्र तळा शहरातील तळा मांदाड रस्त्यावर उभारण्यात आले असून त्याचा 1 मे रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, प्रदूम ठसाळ, राकेश वडके, लीलाधर खातू, डॉ. गजेंद्र मोधे यांसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.