चोंढी येथील पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन


| अलिबाग | वार्ताहर |

लायन्स क्लब मांडवा संचलित ट्रु डायग्नो पॅथॉलॉजी लॅबचा उद्घाटन सोहळा, शुक्रवारी, (दि.7) जून रोजी चोंढी येथे आयोजित करण्यात आला होता. या लॅबचे उद्घाटन प्रथम उपप्रांतपाल एन. आर. परमेश्‍वरन यांच्या हस्ते करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात लायन्स क्लब मांडवाने 7 ऑक्टोबर 2021 दिशा लॅब यांच्या सहकार्याने चोंढी येथे रक्त संकलन केंद्र सुरु केले. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 8 ऑक्टोबर 2022 रोजी या रक्त संकलन केंद्राचे रुपांतर लायन्स पॅथॉलॉजी लॅबमध्ये करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात जागेच्या स्थलांतरासह चोंढी नाक्यावर या लॅबचे रुपांतर 7 जून ट्रु डायग्नो पॅथॉलॉजी लॅबमध्ये करण्यात आले आहे. या लॅबचे उद्घाटन प्रथम उपप्रांतपाल एन.आर. परमेश्‍वरन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष अभिजित गुरव, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, रिजन चेअरमन प्रियदर्शिनी पाटील, झोन चेअरमन विद्या अधिकारी, अंंशुल कंपनीचे शिरीष सातपुते, डॉ. मनीष रॉय, संदीप खैरनार, नयन कवळे, अरविंद वनगे, किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड, डॉ. शुभदा कुडतलकर, लायन्स क्लब मांडवाचे उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव प्रिती पाटील, खजिनदार सतीश म्हात्रे, सुबोध राऊत, अरविंद घरत, अमिष शिरगावकर, प्रदीप सिनकर, अजय आंगणे, महेंद्र पाटील, बी.एन. कोळी, सुमीत पाटील, प्रदीप पाटील, कुणाल पाथरे, धवल राऊत, मल्हार आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version