। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य विधिसेवक प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालय रायगड अलिबागच्या इमारतीत दर्शनी भागात लोक अभिरक्षक कार्यालयाचे एल ए डी एस प्रत्यक्ष उद्घाटन सोमवारी 13 मार्च 2023 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए.बी. भिल्लारे, सत्र न्यायाधीश -२ ए. वाय. थत्ते, सत्र न्यायाधीश -३ एन. के. मनेर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधिश अमोल शिंदे तसेच अन्य न्यायिक वर्ग, वकील वर्ग, डेप्युटी डिफेन्स कौन्सिल चंद्रशेखर कामथेे व असिस्टंट लीगल हे हेड डिफेन्स कौन्सिल अॅड मिलिंद साळगावकर, अॅड नीलोफर शेख, अॅड उषा पाटील, अॅड तन्मय म्हात्रे आदी उपस्थित होते