। शिहू । वार्ताहर ।
चोळे, शिहू, झोतिरपाडा विभागातील शेतकरी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि.29) चोळे येथे शेकाप युवा नेते अतुल म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलनाचे पनवेल तालुका अध्यक्ष अनिल ढवळे, पी. डी. पाटील, शेतकरी संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष अनंत भूरे, शिवसेना शिहू विभाग प्रमुख दिपक पाटील, शेखर शेळके, अ.का.म्हात्रे, के.के.कुथे, जानू कुथे, नारायण पाटील, गजानन नाईक, हेमांगी बंगाल, दिनेश पाटील आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. दहावी बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिहू, नवी मुंढानी, बेणसे, टाऊनशिप, बेणसेवाडी, बेणसे आदिवासीवाडी, गंगावणे येथील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या यावेळी प्रत्येक घरात अतुल म्हात्रे यांचे औक्षण करून स्वागत केले. पेण तालुक्याच्या विकासासाठी अतुल म्हात्रे यांच्या नावाला शिहू झोतिरपाडा विभागातून नागरिकांनी पहिली पसंती दर्शवली आहे.
स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, जे.एस.डब्लू कंपनीकडून होणारे शेतीचे नुकसान, रिलायन्सचे केमिकलयुक्त पाणी जाऊन शेतकर्यांचे होणारे नुकसान, आदिवासी बांधवांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, असे विविध सामाजिक प्रश्न हातात घेवून ते सोडविणार.
अतुल म्हात्रे







