| पाली/बेणसे। प्रतिनिधी।
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका कर्जत यांच्या विद्यमानाने रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र भाई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोंदीवडे येथे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया च्या शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड तसेच, कोकण प्रदेश युवा सरचिटणीस जिवन गायकवाड यांच्या उपस्थितीत शाखेच्या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करून शुभेच्छा देण्यात आल्या.
हिरामण दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य होत आहे. या कार्यक्रमात कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी बीआरएसपी पक्षांचे वेनगाव येथिल नितिन सोनावणे यांचा आरपीआय पक्षामध्ये शाखेच्या उद्घाटन स्थळी जाहीर प्रवेश करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्ते अनंता खंडागळे, अलका सोनवणे, किशोर गायकवाड, जगदीश शिंदे, अशोक गायकवाड, विक्रम आढावे, हरिश्चंद्र सदावरते, अंकुश सुरवसे, विकास गायकवाड, अमर शिंदे, रवींद्र जाधव, अमर गायकवाड, विजय गायकवाड, अशोक दत्तू जाधव, सुरेखा कांबळे, वैशाली भोसल, मनीषा जाधव, निलेश गायकवाड, अशोक जाधव, उमेश भालेराव, महेंद्र भालेराव, प्रवीण सोनवणे, नमिता पाटेकर, आदित्य कदम, संकेत प्रकाश भालेराव, प्रकाश भालेराव, दिनकर पवार, रवी उत्तम लहान, गणेश गायकवाड, गणेश सुरवसे, गोरख सुरवसे, सुरेंद्र हरिचंद्र जाधव आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.