सासरवाडी आस्वादगृहाचे उद्घाटन

। पनवेल । वार्ताहर ।

महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवय्यांसाठी सीवूड्स व बेलापूर शाखेनंतर आता खारघरमध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन सासरवाडी हे आस्वादगृह सेवेत रुजू झाले आहे. फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले हे आस्वादगृह शनिवारपासून खारघरमध्ये जिभेचे चोचले पुरवण्याकरिता उपलब्ध असेल. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना प्राजक्ता माळी हिने सांगितले की, सासरवाडी रेस्टॉरंटच्या तिसर्‍या शाखेचे उद्घाटन होत आहे. यातच आपण समजून घ्या की बाकी शाखा जोमात सुरू आहेत. यातच यश दडलेले आहे. मी दुसर्‍यांदा उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिले. यापूर्वी सुद्धा माझ्या हस्ते याआधीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. यात मला एक कलाकार म्हणून आनंद वाटतो.

Exit mobile version