| उरण | वार्ताहार |
उरण शहरातील गणपती मंदिर बाजार पेठ जवळ असलेले श्रीराम पुरातन मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून देवी-देवतांच्या प्राण प्रतिष्ठेचा उत्सव बुधवार दि.10 ) ते शुक्रवार दि. 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टी चंद्रकांत ठक्कर यांनी दिली. यानिमित्ताने उरण गणपती चौक येथील श्रीराम मंदिरपासून रथ यात्रा काढण्यात आली. या रथ यात्रेत अनेक लहान, ज्येष्ठ महिला, पुरुष सहभागी झाले होते.