। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आवास येथे राज्य स्तरीय क्षात्रेक्य कृषक महोत्सव २०२३ उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संपूर्ण आवास परिसरात भव्य दिंडी शोभायात्रा काढण्यात आली. भव्य दिंडीत विविध शाळा, काॅलेज, शाळा, विद्यार्थ्यांनी तसेच विविध कला आविष्कार सादर केले. या दिंडीमध्ये लेझीम पथक, भजन मंडळ तसेच विविध देव देवतांचे रूप साकारले. सदर दिंडी सोहळ्याला सरपंच अभिजित राणे व उपसरपंच, सर्व ग्रा.पं.सदस्य पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने जन समुदाय तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
![](http://krushival.in/grygrars/2023/01/WhatsApp-Image-2023-01-06-at-1.49.17-PM-1-1024x768.jpeg)
![](http://krushival.in/grygrars/2023/01/WhatsApp-Image-2023-01-06-at-1.49.16-PM-1-1024x768.jpeg)
![](http://krushival.in/grygrars/2023/01/WhatsApp-Image-2023-01-06-at-1.49.16-PM-1024x768.jpeg)