पीएनपी कॉलेजमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पीएनपी कॉलेजमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन डेल्टा कॉर्प चे चेअरमन जयदेव मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पी एन पी एज्यूकेशन संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, फिनोलेक्स कंपनीचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष प्रदीप वेदुला, एडीपी चे प्रमुख सुशांत मानकर, मुकुल माधव फौंडेशनचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र जाधव, पी एन पी महाविद्यालयाचे प्राचार्य प्र. डॉ ओमकार पोटे, सीएफटीआयचे अमित देशपांडे, विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.

संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन डेल्टा कॉर्प चे चेअरमन जयदेव मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पी एन पी एज्यूकेशन संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, फिनोलेक्स कंपनीचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष प्रदीप वेदुला, एडीपी चे प्रमुख सुशांत मानकर, मुकुल माधव फौंडेशनचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र जाधव, पी एन पी महाविद्यालयाचे प्राचार्य प्र. डॉ ओमकार पोटे, सीएफटीआयचे अमित देशपांडे, विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.

या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेतील संगणक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि संगणक शास्त्राचे विद्यार्थी वापरतील. तरुणांना कौशल्याने सक्षम करण्यासाठी आम्ही लवकरच डिजिटल मार्केटिंग, टॅली आणि मूलभूत संगणक साक्षरतेचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. या प्रयोगशाळेचा वापर करून माझ्या महिला बचत गटांना संगणक दृष्ट्या साक्षर करण्याचा माझा मानस असल्याचे मनोदय यावेळी चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

Exit mobile version