रेवदंडा येथे टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचे आयोजन

| रेवदंडा | प्रतिनिधी |

उद्धव ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाच्या वतीने दि. 14, 15, 16 एप्रिल रोजी रेवदंडा हरेश्‍वर मैदानात आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचा शुभारंभ सुरेंद्र म्हात्रे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, ग्रा.प.सदस्य निलेश नाईक, ग्रा.पं.सदस्या कल्याणी बाजी, अतुल वर्तक, बाबू दक्षिकर, आदित्य घरत, प्रतिक नाईक, संस्कार म्हात्रे, अमोल म्हात्रे, अमोल घरत आदी उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 50 हजार रोख व चषक, द्वितीय क्रमांकास 25 हजार व चषक, तृतीय क्रमांकास 25 हजार व चषक, चतुर्थ क्रमांकास 25 हजार रोख व चषक तसेच प्रत्येक सामन्यास मॅन ऑफ द मॅच, स्पर्धेत उत्कृष्ट गोलदांज, उत्कृष्ट फलदांज, मालिकावीर आदी चषक ठेवण्यात आले आहेत.

स्पर्धेचे समालोचन सौरभ भुरे, निरज बनिया करीत असून, पुरूषोत्तम भगत व प्रतिक नाईक, आदित्य नाईक आदी अ‍ॅम्पायरचे काम पहाणार आहेत. स्पर्धेत एकूण 24 संघांना थेट प्रवेश असून, एकूण आठ संघांची तीन गटात लढत होईल. सेमी फायनल व फायनल सामन्यासाठी तीन संघात टॉस उडविण्यात येणार आहे.

Exit mobile version