उसराई देवीच्या सभामंडपाचे उद्घाटन

। रसायनी । वार्ताहर ।
गुळसूंदे जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील यांच्या जिल्हा परिषद सेस फंडातून देवळोली येथे पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून सभामंडप बांधण्यात आले. सदर सभामंडपाचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, राजिप समाजकल्याण सभापती नारायण डामसे, गुळसूंदे जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील, पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, नगरसेवक गणेश कडू, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, जनार्दन सिनारे, ए.डी.पाटील, प्रकाश म्हात्रे, सुभाष भोपी, देवेंद्र मढवी, पराग भोपी, वैभव गलंडे, समाधान आनंदईकर, बबन भालेराव, महेश म्हसे, दत्ता राणे, दत्ता मोकल, अनंत पाटील, काजल पाटील, पंढरीनाथ पाटील, राजश्री पाटील, आदिती गव्हाणकर, वैशाली पावसकर आदी उपस्थित होते.
देवळोली तलावानजीकच्या उसराई देवीसाठी सभामंडप व्हावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील यांच्याकडे मागणी केली होती. यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील यांनी जिल्हा सेस फंडातून उसराई देवीच्या सभामंडपाचे काम पुर्ण केले. उसराई देवीला सभामंडप झाल्याने भक्तांनी जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील यांचे आभार मानले.

Exit mobile version