आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे माजी आ. मनोहर भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उरण शहरातील गणपती मंदिराशेजारी मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील लक्षणीय उपस्थिती होती.

याप्रसंगी भावना घाणेकर, माजी आमदार मनोहर भोईर शिवसेना (उबाठा) यांनी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उरण शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. त्यांनी शहर विकासाचा आपला व्हिजन उपस्थितांसमोर मांडला. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हे मध्यवर्ती कार्यालय आता निवडणुकीचे रणशिंग फुंकून प्रचाराची धुरा सांभाळणार आहे.

यावेळी काँग्रेस नेते मिलिंद पाडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आनंद भिंगार्डे, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणीस रेहमान सय्यद, पनवेल युवक जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल, माजी नगरसेवक जैद मुल्ला, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, युवक रायगड जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील तांडेल, तालुकाध्यक्ष प्रदीप तांडेल, विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे (नाना), युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, उरण शहराध्यक्ष मंगेश कांबळे, तालुका पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस संतोष म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चेतन म्हात्रे, अल्पसंख्याक विभाग प्रमुख बाबा मुकरी, शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, काँग्रेस उरण शहराध्यक्ष गुफरान तुंगेकर, शिवसेनेचे महेश वर्तक, काँग्रेसचे पदाधिकारी – माजी नगरसेवक बबन कांबळे, उरण शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे, उरण शहर अध्यक्ष अफशा मुकरी, शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी तथा माजी नगरसेविका नाहिदा ठाकूर, आई मांगीरदेवी मच्छिमार सोसायटी चेअरमन वैभव कडू, महिला तालुका अध्यक्ष हेमांगी पाटील, प्रार्थना म्हात्रे यांच्यासह शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version