| खोपोली | प्रतिनिधी ।
केटीएसपी मंडळाच्या जनता विद्यालयाच्या रंगमंचकावरून अनेक नाटकाचे प्रयोग झाले आहेत. बुधवारी खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश कळसेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. एकापेक्षा एक डान्स स्पर्धेतील सोनाली पवार यांची लावणी आकर्षण ठरली आहे. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थसभापती चित्रा पाटील, खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, सुरेखा गुरव, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, केटीएस मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, राजू अभाणी, राजू ठक्कर, अनंता हाडप, अबू जळगावकर, दिलीप पोरवाल, नरेंद्र शहा, चंद्रकांत केदारी, भास्कर लांडगे, जयंत पाठक, शांताराम पाटील, दिशा राणे आदि उपस्थित होते.
जनता विद्यालयात रंगमंचाचे उद्घाटन
