। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. भूषण पाटील यांनी कर्जत, खालापूर, अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील व्यसनांचे त्रस्त झालेल्या व्यक्तींसाठी हे केंद्र मदतगार ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
तंबाखुसारखे मादक पदार्थ यांच्यामुळे आरोग्याची हानी होते याची कल्पना असून देखील व्यसन करण्याचे काही थांबत नाही. संपूर्ण भारतात प्रत्येक ठिकाणी व्यसन मुक्ती केंद्र उभारली आहेत.तंबाखू व्यसन मुक्ती केंद्रासारखे केंद्र कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सुरू झाले आहे.तंबाखू व्यसन मुक्ती केंद्राचे उद्घाटन मानसोपचार तज्ञ डॉ. भूषण पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी समुपदेशक डॉ. अमोल लेले, डॉ. कीर्ती रसोटे, डॉ. आशिष बंगिंवर, वंदना प्रसाद, नर्सिंग विभाग प्रमुख आशा पवार आदी उपस्थित होते. डॉ. भूषण पाटील यांनी रायगड हॉस्पिटलमध्ये केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रायगड हॉस्पिटलचे कायदेशीर सल्लागार अॅड. रमाकांत तरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन सिंह, डॉ. सूरज हरणाळे, डॉ. प्रशांत आठवले, डॉ अमोल सातव आदी उपस्थित होते.
नेरळ,