। उरण । वार्ताहर ।
उलवे येथील तलाव परिसरात शौचालय आणि ओपन जिमचे पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम जे. म्हात्रे यांच्या हस्ते गुरूवारी (दि.21) लोकार्पण करण्यात आले.
सचिन राजें येरुणकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रितम जे. म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जानेवारीमध्ये उलवे येथे तलाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी तेथील रहिवासी आणि महिलांनी तलाव परिसरात शौचालय आणि ओपन जिमची आवश्यकता असल्याची मागणी प्रितम म्हात्रे यांच्याकड केली होती. त्यानुसार गव्हाण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा करून तलाव परिसरात शौचालय आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून ओपन जिम उभारणी केली.
यावेळी आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पुढाकाराने महिला सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून तिथे 100% महिलांसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. याप्रसंगी प्रितम जे. म्हात्रे यांच्यासोबत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, रहिवासी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.