पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची उपस्थिती
| चिरनेर | प्रतिनिधी |
शेवा बंदर विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अख्त्यारीत असलेल्या व काही विभाग एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उलवा नोड येथील नव्याने साकारण्यात आलेल्या उलवे पोलीस ठाण्याचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 14) करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. महेश बालदी, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे व पनवेल परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मागील काही वर्षात नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एकूण 20 पोलिस ठाणी असलेल्या नवी मुंबईत उलवे पोलीस ठाण्याच्या रूपाने एका पोलीस ठाण्याची वाढ झाली असून, आत्ता नवी मुंबईतील पोलीस ठाण्यांची संख्या 21 वर पोहोचली आहे. या पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल, न्हावाशेवा पालीलस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्यासह न्हावाशेवा बंदर विभागातील पोलीस कर्मचार्यांनी मेहनत घेतली. लवकरच या उलवे पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकार्याची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती व.पो.नि. अंजुम बागवान यांनी दिली.