सरपंच हर्षदा मयेकर यांची प्रमुख उपस्थिती
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागावमधील बागमळा परिसरात नागाव ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकासकामांचे उद्घाटन व शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवार, दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता बागमळा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरपंच हर्षदा मयेकर यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बागमळा सार्वजनिक व्यायामशाळेच्या नवीन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, बागमळा शाळेकडे जाणाऱ्या बाजूचा रस्ता नूतनीकरण, बागमळा शाळेची दुरुस्ती व रंगरंगोटी तसेच डिजिटलकरणाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरंपच हर्षदा मयेकर यांच्यासह माजी सरपंच नंदकुमार मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, माजी उपसरपंच संदेश नाईक, विद्यमान सदस्य रोहन नाईक, माजी उपसरपंच संतोष घरत व माजी पंचायत समिती सदस्य उदय काठे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सरंपच हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व ग्रामपंचायत नागाव यांनी केले. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून, शिक्षण, आरोग्य व दळणवळण क्षेत्रात सकारात्मक बदल घडणार आहे. दरम्यान, गावातील मुलांच्या शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्याच्या दृष्टीने माजी सरपंच निखिल मयेकर यांच्या पुढाकारातून बागमळा परिसरात नवीन सार्वजनिक व्यायामशाळेची उभारणी करण्यात येत आहे. या व्यायामशाळेमुळे मुलांना नियमित व्यायामाची सवय लागणार असून, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार असल्यामुळे ग्रामस्थांसह तरुणांनी निखिल मयेकर यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी ग्रामविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.







