रोह्यात विविध विकासकामांचे लोकार्पण

अनंत गीते, पंडित पाटील यांची उपस्थिती

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील संभे ग्रामपंचायतीच हद्दीत पाले बुद्रुक, संभे, पाले खुर्द गावातील नळपाणी योजना, अंतर्गत रस्ते, साकव, सामाजिक सभागृह अशा विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते व शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

ग्रामपंचायत हद्दीतील पाले खुर्द गावात जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना एक कोटी चोवीस लाख, रोहा रोड ते गाव रस्ता डांबरीकरण दहा लाख, बौद्धवाडी रस्ता काँक्रिटीकटण आठ लाख, बौद्धवाडी आर.सी.सी. गटार तीन लाख, कालव्यापासून शंकर मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण सात लाख, हरिभाऊ मोरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता पेव्हर ब्लॉक बसवणे पाच लाख, संदीप झोलगेच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण तीन लाख, अशोक ठाकूर यांच्या घराकडे जाणारा काँक्रिटीकरण रस्ता तीन लाख, मनोज तुलवे यांच्या घरारजवळ संरक्षण भिंत दीड लाख, अशी एकूण नऊ विकासकामांचे एक कोटी चौसष्ट लाख पन्नास हजार रुपयांची विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले, तर संभे येथे मुख्य रस्त्याला साकव बांधणे दहा लाख, खालची आळी रस्ता तयार करणे तीन लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्त करणे व संरक्षक भिंत बांधणे पाच लाख चाळीस हजार, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता तयार करणे चार लाख अशी एकूण एकवीस लाख चाळीस हजार रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पाले बुद्रुक येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा पासष्ट लाख, शंकर मंदिर सामाजिक सभागृह सतरा लाख, शंकर पेव्हर ब्लॉक रस्ता दहा लाख, कोलाड रोहा रोड ते पाले बुद्रुक गाव रस्ता डांबरीकरण चौदा लाख, मारुती महाबळे घरापासून विहिरीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण दहा लाख, आरसीसी गटार चार लाख, संरक्षण भिंत मराठी शाळा ते रमेश भगत घर तीन लाख, विठोबा महाबळे ते गणेश कदम आरसीसी गटार तीन लाख, बौद्धवाडी स्मशानभूमी तीन लाख, आदिवासीवाडी स्मशानभूमी तीन लाख, भवानी मंदिर मोटी ते शंकर मंदिर रस्ता काँक्रिटीकरण चार लाख, अशी एकूण एक कोटी छतीस लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ठाकरे गटाचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार अनिल तटकरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, नेते शंकरराव म्हसकर, नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले, शिवराम महाबले, राजेश सानप, मारूती खांडेकर, गोपीनाथ गंभे, गणेश मढवी, विष्णू लोखंडे, मनोहर महाबले, सरपंच समीर महाबले, सदस्य नंदेश यादव, मारूतीबुवा लोखंडे, चेतना लोखंडे, राजेश्री सानप, बबलू सय्यद, माजी सरपंच पांडुरंग महाबळे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version