। नवीन पनवेल । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांच्या प्रयत्नांतून व सततच्या पाठपुराव्याने पाले खुर्द, देवीचा पाडा व ढोंगर्याचा पाडा या गावांमध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.
पाले खुर्द व देवीचा पाडा येथे लावलेल्या हायमास्ट पोलांचे लोकार्पण, गावदेवी तलावाभोवती बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण, बौद्ध स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पाले खुर्द गावातील रस्त्याचे डांबरीकरण व आरसीसी गटार बांधणे, वाचनालय बांधणे या कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक गणेश कडू, अरविंद म्हात्रे, नगरसेवक विष्णू जोशी, शंकर म्हात्रे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, आरडीसी बँकेचे संचालक गणपत देशेकर, किरण दाभणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.







