रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव

| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी परिसरात कडधान्यांच्या पिकाला खराब हवामानाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीला लवकर पेरणी केलेल्या वालाच्या पिकावर काही ठिकाणी बामणी रोग पडल्याने शेतकरी काळजीत पडले आहेत. परिसरातील वडगाव, आपटे, चावणे, मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामातील भातपिकानंतर वाल, मूग, चवळी, हरभरा, मटकी आदी कडधान्याचे पीक घेत आहेत. भातकापणीनंतर अनुकूल वातावरण तयार झाल्याने शेतकर्यांनी कडधान्यांची पेरणी केली.

वातावरण कोरडे आणि गुलाबी थंडी असल्याने रोपांची वाढ चांगली झालेली आहे. मात्र, 15 दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. सायंकाळी आकाशात ढग येतात. थंडीचे प्रमाण कमी झाले आहे, उकाडा जाणवत असल्याने शेतकर्यांची काळजी वाढू लागली आहे. सुरुवातीला पेरणी केलेले कडधान्य, वाल, मुगावर बामणी रोग पडला आहे. रोपे पिवळे होत आहेत, असे शेतकर्यांनी सांगितले.

Exit mobile version