। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील महिलेची फसवणूक झाल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. वेश्वी येथील महिलेने पुजेला जाण्यासाठी मैत्रिणीला विश्वासाने सोन्याचे दागिने घालायला दिल्यानंतर तिने ते परत केले नाही. तिने अनेकदा दागिन्यांची मागणी केली. मात्र आरोपीने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने आरोपी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
वेश्वी येथील महिलेने आरोपीला (रा.म्हाते बुद्रुक, ता.जावळी, म्हाते बु.जि.सातारा) तिच्या मैत्रीणीकडे पुजेकरीता जाण्यासाठी विश्वासाने दागिने घालण्यास दिले होते. मात्र आरोपीने ते दागिने परत न करता फिर्यादी यांची फसवणूक करून पळून गेली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव करीत आहेत.