पाण्याच्या लोंढ्यात 7 वर्षीय मुलीसह वडिलही गेले वाहून

कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना
। कर्जत । संजय गायकवाड I
कर्जतमध्ये- 321.80 मि.मी. पावसाची नोंद झाली, रात्रभर कोसळणार्‍या पावसाने कर्जत तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या, मध्यरात्री नंतर उल्हास, पेज, शिलार नद्यांनी आपली पातळी ओलांडली,तालुका जलमय झाला, तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दामत येथे राहणारे वडील आणि त्याची मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे.

दामत येथील सौशल्या सोसायटी समोर असलेल्या चाळीमधील एक कुटुंब रात्री 1-30 वाजता त्यांचे रूममध्ये पाणी आल्याने रुममधून बाहेर पडून पाण्यातून जात असताना त्यांचेपैकी इब्राहिम बाबुला मणियार वय-40 वर्षे व त्यांची मुलगी जोया वय-7 वर्षे असे वाहून गेले असल्याची घटना समोर आली आहे तर भुतिवली येथील आदिवासी वाडीतील काही बकर्‍या, कोंबड्या चा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत अशी माहिती प्रांत वैशाली परदेशी- ठाकूर यांनी दिली.

Exit mobile version